पवित्र' पोर्टलद्वारे शिक्षक पदभरती; गुरुवारपासून कागदपत्र पडताळणी
छत्रपती संभाजीनगर, 02 सप्टेंबर (हिं.स.)। ''आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्या अधिनस्त शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक संवर्गातील ४६८ रिक्त पदांची भरती ‘पवित्र’ (PAVITRA) पोर्टलद्वारे राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेत श
पवित्र' पोर्टलद्वारे शिक्षक पदभरती; गुरुवारपासून कागदपत्र पडताळणी


छत्रपती संभाजीनगर, 02 सप्टेंबर (हिं.स.)।

'आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्या अधिनस्त शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक संवर्गातील ४६८ रिक्त पदांची भरती ‘पवित्र’ (PAVITRA) पोर्टलद्वारे राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेत शिफारसप्राप्त २९६ उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी गुरुवार दि. ३ ते शनिवार दि.५ सप्टेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या संकेतस्थळावरही अमरावती विभागातील पवित्र पोर्टल शिक्षक भरती व शिफारसप्राप्त उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. कागदपत्रे व प्रमाणपत्रांची पडताळणी अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांच्या कार्यालयात करण्यात येणार आहे. उमेदवारांनी त्यांच्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या दिनांक व वेळेनुसार पडताळणीस उपस्थित राहावे, असे आवाहन अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांच्या कार्यालयाने केले आहे.

पदनिहाय व माध्यमनिहाय शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी तसेच कागदपत्र पडताळणीचे सविस्तर वेळापत्रक आदिवासी विकास विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांनी संकेतस्थळावरील सूचना तपासून त्यानुसार आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

उमेदवारांनी पोर्टलवर नोंदविलेल्या माहितीनुसार आवश्यक स्वयंप्रमाणित शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची मूळ प्रमाणपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भातील प्रमाणपत्रे, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (लागू असल्यास), टीईटी/सीटीईटी प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र तसेच अन्य आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रती व प्रत्येकी एक स्वयंप्रमाणित छायांकित प्रत सोबत आणावी.

सर्व शिफारसप्राप्त उमेदवारांनी त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या दिनांक व वेळेनुसार कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहावे, असे आवाहन अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांच्या कार्यालयाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande