उच्च-व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी वारी ट्रान्सपॉवरची 192 कोटी रुपयांची गुंतवणूक
मुंबई, 02 सप्टेंबर (हिं.स.)। वारी एनर्जीज लिमिटेडची उपकंपनी असलेल्या वारी ट्रान्सपॉवर प्रायव्हेट लिमिटेडने 500MVA आणि 400kV क्षमतेचा, अत्याधुनिक ट्रान्सफॉर्मर निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे 192 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पामुळ
Wari


मुंबई, 02 सप्टेंबर (हिं.स.)। वारी एनर्जीज लिमिटेडची उपकंपनी असलेल्या वारी ट्रान्सपॉवर प्रायव्हेट लिमिटेडने 500MVA आणि 400kV क्षमतेचा, अत्याधुनिक ट्रान्सफॉर्मर निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे 192 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पामुळे कंपनीच्या पॉवर ट्रान्सफॉर्मर निर्मिती क्षमतेत महत्त्वपूर्ण विस्तार होणार आहे.

एप्रिल 2027 पर्यंत हा नवीन प्रकल्प कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. यामुळे वारी ट्रान्सपॉवरला 132 kV, 220kV आणि 400kV व्होल्टेज श्रेणींमधील ट्रान्सफॉर्मर्सची निर्मिती करून ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणे शक्य होईल. भारताच्या विस्तारत चाललेल्या वीज पारेषण आणि अक्षय्य ऊर्जा पायाभूत सुविधांमुळे निर्माण होणारी वाढती मागणी पूर्ण करण्याची कंपनीची क्षमता या गुंतवणुकीमुळे लक्षणीयरीत्या वाढेल, अशी अपेक्षा आहे.

मोठ्या प्रमाणावरील अक्षय्य ऊर्जा निर्मिती आणि ऊर्जा साठवण क्षमता ग्रीडमध्ये समाविष्ट करण्यासाठी सक्षम पारेषण, पायाभूत वितरण (distribution) सुविधांची वाढती गरज आणि विजेची वेगाने वाढणारी मागणी, या पार्श्वभूमीवर हा विस्तार केला जात आहे.

या नवीन सुविधेमुळे, वीज पायाभूत सुविधांच्या संपूर्ण मूल्य साखळीतील आपली क्षमता वारी ट्रान्सपॉवर अधिक बळकट करत आहे; तसेच केवळ अक्षय्य ऊर्जेपुरते मर्यादित न राहता, उच्च-दाब (high-voltage) पारेषणाच्या व्यापक गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने कंपनी आपली व्याप्ती वाढवत आहे.

सध्या कंपनीकडे आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये पूर्ण करावयाच्या कामांसाठी सुमारे 360 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत, ज्यामुळे कंपनीच्या पुढील टप्प्यातील विकास आणि क्षमता विस्तारासाठी एक भक्कम पाया तयार झाला आहे.

ही नवीन 500MVA / 400kV सुविधा वारी ट्रान्सपॉवरच्या (Waaree Transpower) विद्यमान क्षमतांना पूरक ठरेल आणि कंपनीला अधिक मोठ्या, गुंतागुंतीच्या तसेच तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक अशा ऊर्जा पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यास सक्षम करेल.

वारी एनर्जीज लिमिटेडचे संचालक श्री. विरेन दोशी म्हणाले: 500MVA आणि 400kV क्षमतेच्या उत्पादन प्रकल्पामध्ये केलेली 192 कोटी रुपयांची गुंतवणूक ही भारताच्या वीज पायाभूत सुविधांच्या विकासावर आणि विश्वसनीय तसेच उच्च-व्होल्टेज ट्रान्सफॉर्मेशन क्षमतेच्या वाढत्या मागणीवर असलेल्या आमच्या दीर्घकालीन विश्वासाचे प्रतीक आहे. अक्षय्य ऊर्जेचा वापर जसजसा वाढतो आहे, तसतसे ट्रान्समिशन जाळे बळकट करणे आणि नवीन निर्मिती तसेच साठवण क्षमतांचे ग्रीडमध्ये सुरळीत एकत्रीकरण करणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. हा प्रकल्प आमची क्षमता लक्षणीयरित्या वाढवेल आणि आम्हाला विविध व्होल्टेज श्रेणी तसेच वीज पायाभूत सुविधांशी संबंधित उपयोगांसाठी ग्राहकांना सेवा पुरवणे शक्य करेल.

ही गुंतवणूक वारी ट्रान्सपॉवरच्या व्यापक धोरणाचा एक भाग आहे, ज्याद्वारे भारताच्या विकसित होत असलेल्या ऊर्जा क्षेत्राला आधार देण्यास सक्षम, विस्तारक्षम, तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि वैविध्यपूर्ण विद्युत पायाभूत सुविधा व्यवसाय उभारला जाईल, तसेच नवीकरणीय ऊर्जा, बीईएसएस (BESS) आणि ग्रीड पायाभूत सुविधांमध्ये निर्माण होणाऱ्या संधींच्या दृष्टीने तयारी केली जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande