पैठणीच्या धाग्यांतून साकारलं ‘होम मिनिस्टर’चं भव्य होर्डिंग
मुंबई, 02 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्राच्या संस्कृतीशी घट्ट नातं जपत नव्या शक्यता आणि नव्या वाटांकडे आत्मविश्वासाने वाटचाल करणारे ‘पाऊल पुढे पडलंय… जमलंय!’ हे झी मराठीने आपल्या कार्यक्रमांमधून आणि उपक्रमांमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. याच विच
पैठणीच्या धाग्यांतून साकारलं ‘होम मिनिस्टर’चं भव्य होर्डिंग!


मुंबई, 02 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्राच्या संस्कृतीशी घट्ट नातं जपत नव्या शक्यता आणि नव्या वाटांकडे आत्मविश्वासाने वाटचाल करणारे ‘पाऊल पुढे पडलंय… जमलंय!’ हे झी मराठीने आपल्या कार्यक्रमांमधून आणि उपक्रमांमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. याच विचाराला पुढे नेत होम मिनिस्टर ने आणखी एक अनोखा टप्पा गाठला आहे.

‘होम मिनिस्टर’च्या नव्या पर्वाच्या सुरुवातीला नेहमीच्या फ्लेक्सऐवजी कापसे पैठणी यांनी साकारलेल्या पैठणी साडीचा तब्बल 20 फूट उंच आणि 40 फूट रुंद होर्डिंग तयार करण्यात आले आहे. या होर्डिंग बनवण्यासाठी खास पैठणी साडीचा वापर करण्यात आला. महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचे प्रतीक असलेल्या पैठणीला अशा वेगळ्या पद्धतीने जाहिरातीचा भाग बनवण्याचा हा पहिलाच प्रयत्न ठरला आहे. या अनोख्या उपक्रमाला सोशल मीडियावरही चांगला प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांनीही या कल्पनेचे कौतुक केले आहे. ‘होम मिनिस्टर’च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडलेल्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

गेल्या २० वर्षांपासून ‘होम मिनिस्टर’ महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे. आदेश बांदेकर यांच्या सूत्रसंचालनातून हा कार्यक्रम महिलांच्या अनुभव, कर्तृत्व आणि रोजच्या आयुष्यातील खास क्षण प्रेक्षकांसमोर आणतात . या २० वर्षांच्या प्रवासात कार्यक्रमाने जवळपास २५ लाख किलोमीटरचा प्रवास केला असून, आतापर्यंत सुमारे ७,५०० पैठणी साड्या महिलांना देण्यात आल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande