‘सायको रंगा’मधून कलाकारांची दमदार फळी येतेय भेटीला
मुंबई, 02 सप्टेंबर, (हिं.स.)। ‘सायको रंगा’ या आगामी चित्रपटाचा नवीन टीझर प्रदर्शित झाला असून पहिल्या टीझरनंतर आता चित्रपटाच्या कथानकातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखांची ओळख प्रेक्षकांना होत आहे. या टीझरमध्ये रंगाच्या आयुष्यातील संघर्ष व त्याच्यासोबत अस
‘सायको रंगा’मध्ये कलाकारांची दमदार फळी!


मुंबई, 02 सप्टेंबर, (हिं.स.)। ‘सायको रंगा’ या आगामी चित्रपटाचा नवीन टीझर प्रदर्शित झाला असून पहिल्या टीझरनंतर आता चित्रपटाच्या कथानकातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखांची ओळख प्रेक्षकांना होत आहे. या टीझरमध्ये रंगाच्या आयुष्यातील संघर्ष व त्याच्यासोबत असलेल्या आणि त्याच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तिरेखांमुळे कथेला नेमकं कोणतं वळण मिळणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

या टीझरमधून रंगाच्या आयुष्याची आणि त्याच्याभोवतीच्या व्यक्तिरेखांची ओळख होते. सुबोध भावे, देवेंद्र चौगुले, मिलिंद शिंदे, पुष्कर जोग, जान्हवी किल्लेकर, स्मिता गोंदकर, संजय मोहिते (दादू), आनंद काळे, उमेश बोळके, रंजना कुलकर्णी, अमोल नाईक, अनिल राबाडे, एन. डी. चौगुले, सचिन मोरे आणि प्रकाश धोत्रे या कलाकारांच्या व्यक्तिरेखाही टीझरमध्ये पाहायला मिळतात. प्रत्येक पात्राची कथेत असलेली भूमिका आणि रंगासोबत त्यांचं नातं नेमकं काय आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कलाकारांची मोठी फळी ही ‘सायको रंगा’च्या कथानकातील महत्त्वाची बाजू ठरणार आहे.

दिग्दर्शक, लेखक व निर्माते देवेंद्र चौगुले म्हणतात, “‘सायको रंगा’मधून प्रेक्षकांना अॅक्शनसोबत एक दमदार आणि भावनिक कथा अनुभवायला मिळणार आहे. प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला वेगळी ओळख दिली आहे. पडद्यावरची प्रत्येक व्यक्तिरेखा आणि प्रत्येक प्रसंग कथेला पुढे घेऊन जातो. या चित्रपटात अॅक्शन, प्रेम, नातेसंबंध आणि संघर्ष हे सगळे एकमेकांशी जोडले जातात. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत.”

‘सायको रंगा’ हा चित्रपट देवेंद्र चौगुले लिखित, दिग्दर्शित आणि निर्मित असून, स्नेहलराज(दादू) यांनी सहदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. उत्तम चोरडे या नव्या दमाच्या संगीतकाराने अतिशय वेगळ्या धाटणीचे संगीत दिलेले आहे. अँक्शन, स्टंट्स, रोमान्स , ड्रामा, म्युझिकल ट्रीट असलेला ‘सायको रंगा’ हा चित्रपट येत्या २५ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande