दुलीप ट्रॉफी: तिलक वर्माच्या साऊथ झोनचा अंतिम फेरीत प्रवेश
बंगळुरु, 02 सप्टेंबर (हिं.स.)तिलक वर्माच्या साऊथ झोनने नॉर्थ झोनला सात गडी राखून पराभूत करून दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, जिथे आता त्यांचा सामना इशान किशन आणि वैभव सूर्यवंशी यांच्या ईस्ट झोनशी होईल. साऊथ झोनच्या या प्रभावी विजयाचा शिल्
तिलक वर्मा


बंगळुरु, 02 सप्टेंबर (हिं.स.)तिलक वर्माच्या साऊथ झोनने नॉर्थ झोनला सात गडी राखून पराभूत करून दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, जिथे आता त्यांचा सामना इशान किशन आणि वैभव सूर्यवंशी यांच्या ईस्ट झोनशी होईल. साऊथ झोनच्या या प्रभावी विजयाचा शिल्पकार तिलक वर्मा होता. त्याने पहिल्या डावात ११६ आणि दुसऱ्या डावात ५१ धावा नाबाद केल्या. त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. तिलकच्या शानदार खेळीमुळे साऊथ झोनने तीन गडी गमावून १८१ धावांचे लक्ष्य पूर्ण केले.

तत्पूर्वी, नॉर्थ झोनने चौथ्या आणि अंतिम दिवसाची सुरुवात २५६/७ या धावसंख्येवर केली होती आणि दुसऱ्या डावात २९७ धावांवर सर्वबाद होऊन साऊथ झोनसमोर १८१ धावांचे लक्ष्य ठेवले. नॉर्थ झोनसाठी तळाच्या फळीतील फलंदाज अंशुल कंबोजने ३६ धावा करून थोडा प्रतिकार दाखवला. तत्पूर्वी, सनत सागवानने ७६ धावा, तर आयुषने ५२ धावा केल्या. नॉर्थ झोनच्या दुसऱ्या डावात एमडी निधीशने ५६ धावांत दोन बळी घेतले.

तत्पूर्वी, नॉर्थ झोनने चौथ्या आणि अंतिम दिवसाची सुरुवात २५६/७ या धावसंख्येवर केली आणि दुसऱ्या डावात २९७ धावांवर सर्वबाद होऊन साऊथ झोनसमोर १८१ धावांचे लक्ष्य ठेवले. नॉर्थ झोनसाठी खालच्या फळीतील फलंदाज अंशुल कंबोजने ३६ धावा करून थोडा प्रतिकार दाखवला. तत्पूर्वी, सनत सागवानने ७६ धावा, तर आयुषने ५२ धावा केल्या. नॉर्थ झोनच्या दुसऱ्या डावात एमडी निधीशने ५६ धावांत दोन बळी घेतले.

१८१ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना, रिकी भुई आणि एन जगदीसन यांनी ६४ धावांची भागीदारी करून साऊथ झोनला चांगली सुरुवात करून दिली. गुरनूर ब्रारने भुईला बाद करून ही भागीदारी तोडली. भुर्ड ४२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याची विकेट पडल्यानंतर लगेचच, शेख रशीद आबिद मुश्ताकच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. ६५ धावांत दोन विकेट पडल्यानंतर, जगदीसनने डावाची सूत्रे हाती घेतली आणि तिलक वर्मासोबत भागीदारी केली. दोघांनी मिळून धावसंख्या १०० च्या पुढे नेली. १०२ धावांवर असताना साऊथ झोनला तिसरा धक्का बसला आणि जगदीसन मुश्ताकच्या गोलंदाजीवर बाद झाला. तो ४३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दरम्यान, तिलकला रविचंद्रन स्मरणची साथ मिळाली आणि दोघांनी मिळून ८० धावांची अभेद्य भागीदारी केली. तिलकने ५१ धावा केल्या, तर स्मरण ४२ चेंडूंमध्ये ३२ धावांवर नाबाद राहिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande