सन सिटी ते पैठण रोड रस्ता व पुलाचे लोकार्पण
छत्रपती संभाजीनगर, 20 सप्टेंबर (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २९ मधील सन सिटी येथे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या स्थानिक विकास निधीतून साकारण्यात आलेल्या सन सिटी ते पैठण रोड रस्ता व पुलाच्य
अ


छत्रपती संभाजीनगर, 20 सप्टेंबर (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २९ मधील सन सिटी येथे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या स्थानिक विकास निधीतून साकारण्यात आलेल्या सन सिटी ते पैठण रोड रस्ता व पुलाच्या महत्त्वपूर्ण विकासकामाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.

या रस्ता व पुलामुळे परिसरातील नागरिकांची वाहतूक अधिक सुलभ होऊन दळणवळणाला चालना मिळणार आहे. तसेच प्रभाग क्रमांक २९ मधील विकासकामांना यामुळे गती मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, परिसराचा नियोजनबद्ध विकास करणे आणि नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने हे काम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. परिसरातील विकासाची ही वाटचाल पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande