
धाराशिव, 20 सप्टेंबर (हिं.स.)।
दि.२९ सप्टेंबर रोजी लोहारा येथे आयोजित ‘रोजगार महाकुंभ’मध्ये तालुक्यातील जास्तीत जास्त युवावर्गाने सहभागी होऊन रोजगाराच्या उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा.विशेषतः २१ ते ३५ वर्षे वयोगटातील युवकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मराठा समाजासाठी कार्यरत असून महामंडळाच्या योजनांमधून पात्र लाभार्थ्यांना व्याज परताव्याचा लाभ मिळतो.धाराशिव येथील सामाजिक न्याय भवनात विविध महामंडळांची कार्यालये आहेत.नागरिकांनी या कार्यालयांना भेट देऊन योजनांची माहिती घ्यावी आणि पात्रतेनुसार त्यांचा लाभ घ्यावा.पीएम विश्वकर्मा योजनेतूनही कौशल्याला चालना देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतात,असे श्री.गुरव यांनी सांगितले.
महिला बचत गटांना विविध योजनांच्या माध्यमातून उद्योग-व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते.पशुसंवर्धन विभाग,जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग तसेच महिला व बालविकास विभागामार्फतही विविध योजना राबविण्यात येतात.त्यांचा लाभ घेऊन स्वयंरोजगाराची वाट निवडता येते.आज मोठे उद्योजक म्हणून नावारूपाला आलेल्या अनेकांनी शून्यातून व्यवसायाची सुरुवात केली आहे.त्यामुळे कोणत्याही व्यवसायाला कमी लेखू नका. ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे,त्या क्षेत्रात कठोर मेहनत घ्या,असा सल्ला श्री.गुरव यांनी दिला.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसह विविध शासकीय योजनांची माहिती घेत राहावी.‘लोकराज्य’,उद्योजकतेविषयक मासिके आणि विविध वृत्तपत्रांचे नियमित वाचन करून ज्ञान अद्ययावत ठेवले तर यशाचा मार्ग अधिक सुकर होतो,असेही श्री.गुरव यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis