पक्षशिस्त आणि संघटन मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करा : रावसाहेब दानवे
छत्रपती संभाजीनगर, 20 सप्टेंबर (हिं.स.) : पक्षशिस्त आणि संघटन मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केले. जालना येथेली कलश सीडस मंठा चौफुले येथे आयोजित भाजपच्या जिल्हा कार्यक
Q


छत्रपती संभाजीनगर, 20 सप्टेंबर (हिं.स.) : पक्षशिस्त आणि संघटन मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन माजी केंद्रीय मंत्री व

भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केले. जालना येथेली कलश सीडस मंठा चौफुले येथे आयोजित भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीतते बोलत होते.

याप्रसंगी दानवे म्हणाले की, पक्षात शिस्त महत्त्वाची असून आपसातील मतभेदांना तिलांजली देऊन सर्वांनी पक्षवाढीसाठी काम करण्याची गरज आहे.

प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने पक्षशिस्तीचे पालन करत संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याची सूचना त्यांनी केली.

‘कालचा भाजप, आजचा भाजप आणि उद्याचा भाजप’ अधिक सक्षम, संघटित आणि जनसेवेसाठी समर्पित राहण्यासाठी सर्वांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचेही दानवे यांनी सांगितले.

बैठकीस माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार सुहास शिरसाट, माजी आमदार कैलास गोरट्याल, महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, बद्रि पठाडे, अशोक अण्णा पांगारकर, महेश निकम यांच्यासह सर्व नगरसेवक, जालना महानगर जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande