वर्धा जिल्ह्यातून 4 सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार
वर्धा 20 सप्टेंबर (हिं.स.)। शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी हिंगणघाट पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. संघटितपणे अवैध दारू विक्री आणि शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना
वर्धा जिल्ह्यातून 4 सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार


वर्धा 20 सप्टेंबर (हिं.स.)। शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी हिंगणघाट पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. संघटितपणे अवैध दारू विक्री आणि शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी, तर अमली पदार्थ व महिलांविरुद्ध गुन्हे करणाऱ्या एका गुन्हेगाराला सात दिवसांसाठी वर्धा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

आकाश ऊर्फ लिंबू अमर तेलतुंबडे (वय २६) जगदीश अमर तेलतुंबडे (वय २९) दाेघेही रा. संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट), अजय ज्ञानेश्वर मातकर (वय ४७, रा. संत चोखोबा वाॅर्ड, हिंगणघाट), सुजित अशोकराव गावंडे (वय २८, रा. संत कबीर वार्ड, हिंगणघाट) यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. हिंगणघाटचे ठाणेदार अनिल राऊत यांनी हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले होते. त्यानुसार, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी मंजुरी देत दोन वर्षांच्या हद्दपारीचे आदेश जारी केले. तसेच, अमली पदार्थ आणि महिलांविरुद्ध गुन्हे करणाऱ्या सुजित गावंडे याच्याविरुद्ध पाठवलेल्या प्रस्तावाला उपविभागीय अधिकाऱ्यांनी मंजुरी देऊन त्याला सात दिवसांसाठी हद्दपार केले आहे. ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अनिल राऊत, प्रवीण देशमुख, संग्राम मुंडे, शिवशंकर यादव आणि संतोष लोहटे यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande