लातुरात साकारला पाना-फुलांचा गणपती
लातूर, 20 सप्टेंबर (हिं.स.)। पर्यावरण रक्षण व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याच्या हेतूने सौ. केशरबाई पर्यावरणस्नेही मंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक पाना-फुलांचा गणपती साकारण्यात आला असून हा गणपती विद्यार्थी, पालक व गणेश भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबि
गणेशोत्सव


लातूर, 20 सप्टेंबर (हिं.स.)।

पर्यावरण रक्षण व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याच्या हेतूने सौ. केशरबाई पर्यावरणस्नेही मंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक पाना-फुलांचा गणपती साकारण्यात आला असून हा गणपती विद्यार्थी, पालक व गणेश भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

पर्यावरण आणि परंपरा यांचा मेळ राखत पर्यावरण संवर्धन व संस्कृती जतन या भूमिकेतून माती, पाणी, फुले व पाणी यांच्या सुंदर मिलाफातून आकर्षक व रेखीव पर्यावरणपूरक पाना-फुलांची संदेशमूर्ती तयार करण्यात आली. ज्या निसर्गातून दुर्वा, फुले, अगरडा, बेलपत्र, शमीपत्र इत्यादी पूजा साहित्य वापरतो त्यांचा केवळ वापर न करता त्यांचे संवर्धनही केले पाहिजे या उद्देशाने मंडळातर्फे प्रसाद म्हणून सीडबॉल वाटप करण्यात येत आहे. यातून निसर्ग निरीक्षण व वनस्पती ज्ञान वाढीस लागून गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता निसर्ग शिक्षणाचा उत्सव होऊ शकेल.

गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहाता ती पर्यावरण संवर्धनाची चळवळ व्हावी, हा आमचा प्रयत्न आहे. बाप्पाच्या दशर्नासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या हातात सीडबॉल देऊन त्यातून एक तरी रोपटे रुजावे, हीच अपेक्षा आहे. आज प्रसाद म्हणून दिलेले हे छोटेसे बी उद्या मोठे झाड होऊन निसर्गाला सावली देईल, असे मुख्याध्यापक भीमराव दुनगावेम्हणाले.

या नावीन्यपूर्ण संदेशमूर्तीची संकल्पना व निर्मिती दयानंद वाणीज्य महाविद्यालयाचे प्रा. अजय चव्हाण यांनी केली असून त्यांना याकामी मुख्याध्यापक भीमराव दुनगावे, विलास पांचाळ यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. मंडळाच्या या उपक्रमाचे शहरातील पर्यावरण अभ्यासक व पर्यावरण विषयक काम करणाऱ्या संस्थांनी कौतुक केले असून कमलकिशोर अग्रवाल, आशिषची बाजपेयी, शैलेश लाहोटी, लक्ष्मीरमण लाहोटी आदींनी मंडळाच्या उपक्रमास

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande