पापाराझींवर संतापला सलमान खान
मुंबई, 20 सप्टेंबर (हिं.स.)। ‘बिग बॉस २०’च्या नुकत्याच झालेल्या ‘वीकेंड का वार’ भागात सलमान खानने महिला कलाकारांच्या खासगीपणा आणि सन्मानाशी संबंधित मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली. अभिनेत्रींचे मागून आक्षेपार्ह फोटो काढून ते सोशल मीडियावर शेअर करणाऱ्
Salman Khan gets angry at the paparazzi


मुंबई, 20 सप्टेंबर (हिं.स.)। ‘बिग बॉस २०’च्या नुकत्याच झालेल्या ‘वीकेंड का वार’ भागात सलमान खानने महिला कलाकारांच्या खासगीपणा आणि सन्मानाशी संबंधित मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली. अभिनेत्रींचे मागून आक्षेपार्ह फोटो काढून ते सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या पापाराझींवर त्याने टीका केली. या फोटोंसोबत ‘कोण?’ अशा स्वरूपाचे कॅप्शन वापरण्याच्या प्रकारावरही त्याने आक्षेप घेतला. अशा प्रकारचे वर्तन अयोग्य असल्याचे सांगत सलमानने अभिनेत्रींकडे याविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले.

सलमानने सांगितले की, अनेक अभिनेत्री अशा प्रकारे फोटो काढले जात असल्यामुळे अस्वस्थ होतात. सई मांजरेकरचे उदाहरण देताना त्याने नुकतेच तिला अशा परिस्थितीत अस्वस्थ झाल्याचे पाहिल्याचे सांगितले. नेहा धुपियानेही अशा प्रकारच्या वर्तनाविरोधात सार्वजनिकपणे आवाज उठवला असल्याचे सलमानने नमूद केले. त्याच्या मते, प्रत्येक महिलेच्या स्वतःच्या खासगी मर्यादा असतात आणि त्यांच्या संमतीशिवाय अशा प्रकारे फोटो काढणे योग्य नाही.

सलमानने आपल्या भाचीशी संबंधित एक अनुभवही सांगितला. त्याने सांगितले की, त्याची भाची कुठेतरी जात असताना काही लोकांनी सतत तिचे मागून फोटो काढले आणि सोशल मीडियावर ‘ओळखा पाहू कोण?’ अशा कॅप्शनसह ते फोटो शेअर केले. महिलांना अशा प्रकारचे वर्तन आवडत नसेल, तर त्यांनी त्याविरोधात कठोर भूमिका घेतली पाहिजे, असे सांगत सलमानने या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केला.

सलमानने पुढे सांगितले की, अशा लोकांची ओळख समोर आल्यास त्यांना जाब विचारण्याची आपली इच्छा आहे. तो म्हणाला की, तो ज्या बहुतांश महिलांना ओळखतो, त्यापैकी अनेक आता आई झाल्या आहेत आणि त्यांनाही कधीही अशा प्रकारे फोटो काढून घेणे आवडलेले नाही. सलमानच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरही महिला कलाकारांची खासगीपणा आणि पापाराझींच्या कामाच्या पद्धतीवर चर्चा सुरू झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande