रायगड : आसरे गावात मध्यस्तीसाठी गेलेल्याची हत्या, महिलेला अटक
रायगड, 20 सप्टेंबर (हिं.स.) : दोन पक्षांमध्ये सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खालापूर तालुक्यातील आसरे येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित महिलेला
The situation was shaken! Isma, who went to settle the dispute, was killed; The accused woman was handcuffed


रायगड, 20 सप्टेंबर (हिं.स.) : दोन पक्षांमध्ये सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खालापूर तालुक्यातील आसरे येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित महिलेला अटक केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आसरे परिसरात किरकोळ कारणावरून दोन पक्षांमध्ये वाद सुरू झाला होता. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. भांडणाचा आवाज ऐकून संबंधित व्यक्ती वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याच्या उद्देशाने घटनास्थळी गेली. त्यावेळी संशयित महिलेने त्यांच्यावर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित महिलेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, हा वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला आणि हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. ----------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande