पूर्णा नदीवरील पुलाचे उद्घाटन दानवेंच्या हस्ते व्हावे
वालसा खालसा ग्रामस्थांची भावना छत्रपती संभाजीनगर, 20 सप्टेंबर (हिं.स.) : वालसा खालसा येथील पूर्णा नदीवरील पुलाचे उद्घाटन भाजप नेते तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते व्हावे, अशी मनापासूनची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. यासंदर्भात ग्राम
अ


वालसा खालसा ग्रामस्थांची भावना

छत्रपती संभाजीनगर, 20 सप्टेंबर (हिं.स.) : वालसा खालसा येथील पूर्णा नदीवरील पुलाचे उद्घाटन भाजप नेते तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते व्हावे, अशी मनापासूनची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. यासंदर्भात ग्रामस्थांनी दानवे यांची भेट घेऊन त्यांना उद्घाटनासाठी उपस्थित राहण्याची विनंती केली.

पूर्णा नदीवरील हा पूल अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नांतून या पुलाचे काम मार्गी लागल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. ‘हा पूल आपल्या प्रयत्नांमुळे साकार झाला असून, त्याचे उद्घाटनही आपल्या हस्ते व्हावे,’ अशी भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.

गावकऱ्यांचा विश्वास, प्रेम आणि आपुलकी हीच जनसेवेची खरी प्रेरणा असल्याचे सांगत, त्यांच्या या भावनेचा मनापासून आदर असल्याचे रावसाहेब दानवे यांनी नमूद केले.

पुलामुळे परिसरातील नागरिकांची वाहतूक सुलभ होऊन दळणवळणाला मोठी मदत होणार असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande