
छत्रपती संभाजीनगर, 20 सप्टेंबर (हिं.स.)।
अखिल भारतीय आध्यात्मिक समितीच्या वतीने आयोजित ‘विश्व शांती यात्रा’ अभियानाच्या माध्यमातून शांतता, सद्भावना, बंधुभाव आणि मानवी मूल्यांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
छत्रपती संभाजी नगर येथे दुग्धविकास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत उपक्रम राबविण्यात आला.
आजच्या धावपळीच्या जीवनात मनःशांती आणि परस्परांतील प्रेमाची गरज अधिक आहे. अध्यात्मिक मूल्ये, करुणा आणि एकतेचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis