सुरेश बनकर यांचे रावसाहेब दानवेंकडून अभिनंदन; पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा
छत्रपती संभाजीनगर, 20 सप्टेंबर (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर पूर्व जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाजप नेते सुरेश बनकर यांनी भोकरदन येथील पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी सद
अ


छत्रपती संभाजीनगर, 20 सप्टेंबर (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर पूर्व जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाजप नेते सुरेश बनकर यांनी भोकरदन येथील पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी रावसाहेब दानवे यांनी सुरेश बनकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून जिल्हाध्यक्षपदाच्या पुढील कार्यकाळासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. बनकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षसंघटना अधिक मजबूत होऊन जनसेवेचे कार्य अधिक व्यापक होईल, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनीही सुरेश बनकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande