परभणी - नागरी आरोग्य सेवा अधिक सक्षम करू - डॉ. सुनील भोकरे
परभणी, 21 सप्टेंबर (हिं.स.)।नागरी आरोग्य सेवा अधिक सक्षम करू अशी ग्वाही डॉ. सुनील भोकरे, आयुक्त, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान यांनी दिली आहे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली नागरी भागातील आरोग्य सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी स्थान
परभणी - नागरी आरोग्य सेवा अधिक सक्षम करू - डॉ. सुनील भोकरे


परभणी, 21 सप्टेंबर (हिं.स.)।नागरी आरोग्य सेवा अधिक सक्षम करू अशी ग्वाही डॉ. सुनील भोकरे, आयुक्त, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान यांनी दिली आहे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली

नागरी भागातील आरोग्य सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका आणि आरोग्य विभाग यांचा समन्वय अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांना दर्जेदार व सहज उपलब्ध आरोग्य सेवा देण्यासाठी आवश्यक सुविधा आणि मनुष्यबळ बळकट करण्यावर शासनाचा भर आहे. मानवतमधील आरोग्य सुविधांची माहिती घेतली असून आवश्यक बाबींचा पाठपुरावा केला जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande