७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर (हिं.स.)मंच सज्ज आहे, प्रकाशयोजना तयार आहे आणि भारतीय चित्रपटसृष्टीतल्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींवर प्रकाशझोत पडणार आहे. 22 सप्टेंबर 2026 रोजी गुजरातमधल्या केवडिया इथल्या एकता नगर इथे होणाऱ्या 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात


नवी दिल्ली, 21 सप्टेंबर (हिं.स.)मंच सज्ज आहे, प्रकाशयोजना तयार आहे आणि भारतीय चित्रपटसृष्टीतल्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींवर प्रकाशझोत पडणार आहे. 22 सप्टेंबर 2026 रोजी गुजरातमधल्या केवडिया इथल्या एकता नगर इथे होणाऱ्या 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची जोरदार तयारी सुरू आहे. 2024 या वर्षातल्या भारतीय चित्रपटसृष्टीतल्या अतुलनीय कामगिरीची दखल घेत राष्ट्रपती हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करतील.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे भारतीय चित्रपटसृष्टीतल्या सर्वात प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक आहेत. 1954 मध्ये सुरू झालेले हे पुरस्कार कथानक चित्रपट, कथाबाह्य चित्रपट आणि चित्रपटविषयक लेखन यांमधल्या उत्कृष्टतेची निवड करतात. यामध्ये विविध भाषा, प्रदेश आणि चित्रपट निर्मितीच्या विविध प्रकारांचा समावेश होतो.

दादासाहेब फाळके पुरस्कार

भारतीय चित्रपटसृष्टीतल्या अतुलनीय योगदानाची दखल घेत दिग्गज अभिनेते अनंत नाग यांना 2024 चा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रपती 22 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना या प्रतिष्ठित सन्मानाने गौरवणार आहेत.

5 दशकांहून अधिक काळाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत, अनंत नाग यांनी विविध कलाकृतींद्वारे कन्नड आणि भारतीय चित्रपटसृष्टीत चिरंतन योगदान दिले आहे. हा सन्मान त्यांचा उल्लेखनीय कलात्मक प्रवास आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या समृद्ध वारशातल्या त्यांच्या चिरंतन योगदानाचा गौरव करतो.

भारतीय सर्वोत्कृष्ट कामगिरीचा उत्सव

72 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देशभरातले सर्वोत्तम चित्रपट, सादरीकरणे आणि सर्जनशील प्रतिभा एकत्र आणतील.

'आर्टिकल 370' ला सर्वोत्कृष्ट कथात्मक चित्रपट म्हणून घोषित करण्यात आले आहे, तर 'भंगार' ला सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपट आणि 'राम-नामी' ला सर्वोत्कृष्ट माहितीपट म्हणून निवडण्यात आले आहे.

अभिनय श्रेणीमध्ये, ‘ब्रह्मयुगम’ चित्रपटासाठी अभिनेते मामूटी यांची तर, ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटासाठी अभिनेते कार्तिक आर्यन यांची ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ (मुख्य भूमिका) म्हणून निवड करण्यात आली आहे तर, 'आर्टिकल 370' चित्रपटासाठी यामी गौतम यांना 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' (मुख्य भूमिका) हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटासाठी रणदीप हुड्डा यांची 'सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील विविधता आणि संपन्नता दर्शवणाऱ्या विविध श्रेणींमध्ये इतर अनेक चित्रपट आणि कलाकारांचाही गौरव करण्यात येणार आहे.

'कल्की 2898 एडी', 'अमरन', 'पुष्पा: द रूल पार्ट-02', 'भूल भुलैया 3' आणि 'स्त्री 2' यांसारख्या चित्रपटांनाही विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात येणार आहे.

सोहळ्याचा देशभरात प्रवास

72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या उत्सवातील एका नवीन अध्यायाची सुरुवात ठरत आहे. राष्ट्रीय राजधानीच्या बाहेर साजरा होणारा हा समारंभ गुजरातमधील एकता नगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

आगामी काळात 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळा देशाच्या विविध भागांत आयोजित करण्याचा निर्णय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने घेतला आहे. या उपक्रमामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा हा उत्सव विविध प्रदेशांमध्ये होईल आणि त्यातून देशाच्या समृद्ध सांस्कृतिक आणि चित्रपटविषयक विविधतेचे दर्शन घडेल.

या सोहोळयाची सर्व तयारी पूर्ण झाली असून व्यासपीठ सज्ज झाले आहे; आता सर्वांचे लक्ष 22सप्टेंबर 2026 या दिवसाकडे लागले आहे, जेव्हा भारतीय चित्रपटसृष्टीतील निर्माते, अभिनेते, तंत्रज्ञ आणि इतर सदस्य 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी एकता नगर येथे एकत्र येणार आहेत.

--------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande