
छत्रपती संभाजीनगर, 21 सप्टेंबर (हिं.स.)। भरती प्रक्रिये संदर्भात विद्यार्थ्यांनी मांडलेल्या सर्व सूचनांचे दस्तऐवजीकरण करण्यात येत आहे. अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी ते बोलत होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही राज्य शासनासाठी महत्त्वाची संस्था असून, विद्यार्थ्यांच्या भावना व सूचना एकत्रितपणे विचारात घेऊन परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभ्यास केला जाईल. प्राप्त सूचनांच्या आधारे शासनाला अहवाल सादर करण्यात येईल. याचाही उल्लेख दाते यांनी केला.श्री. डॉ. एन. रामास्वामी यांनी सांगितले, उमेदवारांच्या पात्रतेचे निकष स्पष्ट असावेत. परीक्षा केंद्रांची किमान गुणवत्ता, पर्यवेक्षकांची निवड व प्रशिक्षण, प्रश्नपत्रिकेची गुणवत्ता तसेच परीक्षा प्रक्रियेतील सुरक्षितता यावर लक्ष देणे आवश्यक आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, परीक्षा केंद्रांचे ऑडिट आणि पेपर तपासणीची कार्यपद्धती अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्याबाबतही विचार केला जात आहे.
प्रवीण गेडाम म्हणाले, विद्यार्थ्यांनी ऑनलाइन, संगणकाधारित व ऑफलाइन परीक्षा पद्धती, वस्तुनिष्ठ व वर्णनात्मक प्रश्नपत्रिका, परीक्षा केंद्रांवरील सुविधा, वेटिंग लिस्ट, ऑडिट तसेच पेपर तपासणीबाबत अभ्यासपूर्ण सूचना मांडल्या आहेत. परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांचा सखोल अभ्यास करून आवश्यक त्या सुधारणा सुचविण्यात येतील.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis