
परभणी, 21 सप्टेंबर (हिं.स.)। भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त पद्मिनी मंगल कार्यालय, सोनपेठ येथे आयोजित परभणी जिल्हा महानुभाव परिषद, सोनपेठ तालुका अंतर्गत अवतार दिन महोत्सवास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश विटेकर यांनीउपस्थित राहून भगवान श्री चक्रधर स्वामींचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच उपस्थित भाविक भक्तांशी संवाद साधून सर्वांना अवतार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
भगवान श्री चक्रधर स्वामींनी समाजाला समता, बंधुता, अहिंसा, मानवता आणि सदाचाराचा संदेश दिला. जात-पात, भेदभाव आणि अंधश्रद्धेपेक्षा मानवतेला सर्वोच्च स्थान देत त्यांनी सर्वसामान्यांना भक्ती, ज्ञान आणि सद्विचारांचा मार्ग दाखविला. त्यांच्या विचारांची शिकवण आजही समाजाला प्रेरणा देणारी आहे.या पवित्र दिनानिमित्त भगवान श्री चक्रधर स्वामींच्या विचारांचा आणि मानवतेचा संदेश प्रत्येकाच्या जीवनात रुजावा, समाजात प्रेम, एकोपा व बंधुभाव वाढावा, असे आमदार विटेकर म्हणाले
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis