नंदूरबार : जनगणना-2027 : दुसऱ्या टप्प्याच्या तयारीला वेग
नंदुरबार, 21 सप्टेंबर (हिं.स.) : जनगणना-2027 च्या दुसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेच्या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षणाकडे चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने पाहून प्रशिक्षणात दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. प्रशिक्षणादरम्यान
कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण


अधिकारी आशा संघवी


नंदुरबार, 21 सप्टेंबर (हिं.स.) : जनगणना-2027 च्या दुसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेच्या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षणाकडे चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने पाहून प्रशिक्षणात दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. प्रशिक्षणादरम्यान प्रक्रियेची अचूक माहिती समजून घेतल्यास पुढील टप्प्यातील कामकाजात अडचणी येणार नाहीत आणि जनगणनेचे काम अधिक प्रभावीपणे पूर्ण करता येईल, असे प्रतिपादन जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीर बिरसा मुंडा सभागृहात जनगणना-2027 च्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास जनगणना कार्य संचालनालय, मुंबईचे सहायक संचालक अजय ठाकूर, एसआय जीआर-2 श्रीकांत बनकर, नायब तहसीलदार रमेश वळवी, सर्व चार्ज अधिकारी तथा तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी आणि जनगणना कर्मचारी उपस्थित होते.आशा संघवी म्हणाल्या की, जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील घरांची यादी व घरगणना प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेला सुरुवात होणार असून, दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्या गणना करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर इन्युमरेशन ब्लॉकची निर्मिती आणि संक्षिप्त गृहसूची तयार करण्याच्या अनुषंगाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.मागील टप्प्यातील अनुभव लक्षात घेऊन पुढील टप्प्यातही नंदुरबार जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात अग्रस्थानी राहावे, यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

८०० पेक्षा अधिक लोकसंख्येच्या ब्लॉकची पुनर्रचना

सहायक संचालक अजय ठाकूर यांनी सांगितले की, जनगणना-2027 च्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाजात अचूकता आणि काटेकोरपणा अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या इन्युमरेशन ब्लॉकमध्ये लोकसंख्या 800 पेक्षा अधिक आहे, अशा ब्लॉकची आवश्यकतेनुसार पुनर्रचना (रिसेटिंग) करण्याची कार्यवाही प्राधान्याने करावी.यासाठी उपलब्ध पीपीटी, परिपत्रके तसेच जनगणना कार्य संचालनालयाने तयार केलेल्या प्रशिक्षणपर व्हिडिओचा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले.

प्रत्येक व्यक्तीची 40 प्रश्नांद्वारे माहिती

दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र माहिती संकलित करण्यात येणार असून, त्यासाठी 40 प्रश्नांची माहिती घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रगणकांकडून माहिती संकलनाची प्रक्रिया अचूकपणे पार पडण्यासाठी चार्ज अधिकाऱ्यांनी संपूर्ण कामकाजावर प्रभावी नियंत्रण व देखरेख ठेवणे आवश्यक असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले.जनगणनेची माहिती गोपनीय असून ती कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला देऊ नये. पहिल्या टप्प्यातील कामकाजातील अनुभव आणि त्रुटी लक्षात घेऊन दुसऱ्या टप्प्यातील कामकाज वेळेत व अचूकपणे पूर्ण करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी आवाहन केले.

इन्युमरेशन ब्लॉक निर्मितीबाबत सविस्तर मार्गदर्शन

यावेळी श्रीकांत बनकर यांनी प्रगणक तयार करण्याची सर्वसाधारण तत्त्वे, प्रगणक गट तयार करण्याची पद्धत, मांडणी दर्शक नकाशाचे पुनरावलोकन, गणना घराची निवड व वाटप, संक्षिप्त गृहसूची तसेच इन्युमरेशन ब्लॉकची अचूक निर्मिती व नोंदणी करण्याच्या पद्धतीबाबत पीपीटीच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande