मराठवाडा मुक्तिसंग्रामातील क्रांतिकारकांच्या शौर्यगाथेचे प्रदर्शन, क्रांतिकारकांच्या कुटुंबियांचा सन्मान सोहळा
बीड, 21 सप्टेंबर (हिं.स.)। लोकनेते स्वर्गीय सुंदररावजी सोळंके यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त तसेच मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून मराठवाडा मुक्तिसंग्रामातील क्रांतिकारकांच्या शौर्यगाथेचे प्रदर्शन, क्रांतिकारकांच्या कुटुंबियांचा सन्मान सो
अ


बीड, 21 सप्टेंबर (हिं.स.)।

लोकनेते स्वर्गीय सुंदररावजी सोळंके यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त तसेच मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून मराठवाडा मुक्तिसंग्रामातील क्रांतिकारकांच्या शौर्यगाथेचे प्रदर्शन, क्रांतिकारकांच्या कुटुंबियांचा सन्मान सोहळा तसेच भव्य शिवकालीन शाही शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या त्यागाला आणि शौर्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.

मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा केवळ संघर्षाचा इतिहास नाही, तर त्याग, धैर्य, स्वाभिमान आणि मातृभूमीवरील निष्ठेची प्रेरणादायी गाथा आहे. निजामशाहीच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढताना अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी आपले जीवन समर्पित केले. अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या त्यागामुळेच मराठवाड्याला स्वातंत्र्याचा सूर्य पाहता आला.

या महान लढ्याचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. याच भावनेतून क्रांतिकारकांच्या संघर्षातील विविध प्रसंग, त्यांचे योगदान आणि शौर्यगाथा प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आली. इतिहास केवळ पुस्तकांपुरता मर्यादित न राहता तो नव्या पिढीने समजून घ्यावा, अनुभवावा आणि त्यातून प्रेरणा घ्यावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

क्रांतिकारकांच्या कुटुंबियांचा सन्मान करून त्यांच्या त्यागाची आठवण जपण्याचा आणि त्यांच्या योगदानाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच शिवकालीन शाही शस्त्र प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या समृद्ध ऐतिहासिक आणि शौर्यपरंपरेची ओळख उपस्थितांना करून देण्यात आली.

या कार्यक्रमाची मुख्य सुरुवात माजलगाव शहरातील ऐतिहासिक झेंडा चौक येथून तिरंगा रॅलीने करण्यात आली. या निमित्ताने झेंडा चौकाच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देत, माजलगाव शहरातील क्रांतिकारकांनी एकत्रित येऊन याच ठिकाणी केलेल्या झेंडा सत्याग्रहाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वातंत्र्याच्या लढ्यात माजलगावच्या भूमीने दिलेले योगदान आणि येथील क्रांतिकारकांनी दाखविलेला त्याग, धैर्य व देशभक्ती पुढील पिढीला सांगता आली, याचा मनस्वी आनंद आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्रामातील क्रांतिकारकांनी दिलेला लढा, त्यांचा त्याग आणि स्वातंत्र्यासाठीची त्यांची निष्ठा सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या शौर्यगाथा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे, हा त्यांच्या स्मृतींना खऱ्या अर्थाने अभिवादन करण्याचा मार्ग आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande