
छत्रपती संभाजीनगर, 21 सप्टेंबर (हिं.स.)। पाऊस नाही, पीक नाही; मग शेतकऱ्याने जगायचे कसे? असा सवाल मराठवाड्यातील शेतकरी उपस्थित करीत आहेत. पावसाने आणखी ओढ दिल्यास मराठवाडा विभागातील तालुक्यातील खरीप पिकांची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने तातडीने सर्वेक्षण करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, नुकसानग्रस्त क्षेत्र निश्चित करावे आणि मदतीची घोषणा करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यानंतर आता शासनानेही कार्यालयातील फाईली बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या बांधावर उतरावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis