जलसंधारण योजनांच्या जलाशयात गणेशमूर्ती व निर्माल्य विसर्जित न करण्याचे आवाहन
नंदुरबार, 21 सप्टेंबर (हिं.स.) अल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे परिसरातील जलसंधारण योजनांमधील पाण्याचा वापर प्रामुख्याने गाव व शहरांसाठी पिण्याचे पाणी, शेती सिंचन तसेच पशुधनासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे ग
जलसंधारण योजनांच्या जलाशयात गणेशमूर्ती व निर्माल्य विसर्जित न करण्याचे आवाहन


नंदुरबार, 21 सप्टेंबर (हिं.स.) अल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे परिसरातील जलसंधारण योजनांमधील पाण्याचा वापर प्रामुख्याने गाव व शहरांसाठी पिण्याचे पाणी, शेती सिंचन तसेच पशुधनासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या सांगतेवेळी जलाशय, सिंचन तलाव, साठवण तलाव, पाझर तलाव, गाव तलाव तसेच कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये गणेशमूर्ती व निर्माल्य विसर्जन करून जलप्रदूषण होणार नाही, याची नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन वानरे यांनी केले आहे.

गणेशमूर्ती व निर्माल्य विसर्जनामुळे जलप्रदूषण होऊन नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम

होण्याची शक्यता असते. तसेच धरण व जलाशय परिसरातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने

विसर्जनाच्या वेळी जीवितहानीच्या घटना घडण्याची शक्यता असून, नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका

निर्माण होऊ शकतो.

मृद व जलसंधारण विभागामार्फत दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ‘सेवा संकल्प

अभियान’ राबविण्यात येत आहे. तसेच दि. 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत

‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत असून, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, समृद्ध महाराष्ट्र घडवा’ हा

संदेश देण्यात येत आहे. जलाशयातील जलप्रदूषण टाळणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे तसेच नागरिकांची

सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने जलसंधारण योजनांच्या जलाशयांमध्ये व धरणांमध्ये गणेशमूर्ती व

निर्माल्य विसर्जन करण्यास प्रतिबंध करण्याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे.

धरण परिसरातील शहरे व गावांमध्ये स्थानिक प्रशासन तसेच ग्रामपंचायतींच्यास्तरावर दवंडी व अन्य

माध्यमांतून जनजागृती करण्यात यावी. जलप्रदुषण व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नागरिकांनी गणेशमूर्ती

विसर्जनासाठी स्थानिक प्रशासनाने सूचित केलेल्या अधिकृत ठिकाणीच विसर्जन करावे, असे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande