
नंदुरबार, 21 सप्टेंबर (हिं.स.) महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने जिल्ह्यातील युवक- युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व कौशल्यानुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात मंगळवार, 29 सप्टेंबर 2026 रोजी भव्य रोजगार मेळावे तथा प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहाय्यक आयुक्त मंगेश वाघ यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी (धडगाव) आणि नवापूर या सर्व 6
तालुक्यांमध्ये मिळून एकूण 9 ठिकाणी हे रोजगार मेळावे होणार आहे. या रोजगार महाकुंभाचा मुख्य उद्देश
अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी, पदवीधर, पदविकाधारक (डप्लोमा), आयटीआय उत्तीर्ण तसेच अनुभवी
बेरोजगार युवक-युवतींना नामांकित कंपन्या आणि उद्योगांमध्ये थेट आणि विनामूल्य रोजगाराची संधी
उपलब्ध करून देणे हा आहे.
तालुकानिहाय मेळाव्याची प्रमुख ठिकाणे:
नंदुरबार तालुका: 1) गजमल तुळशीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नंदुरबार
2) जिजामाता एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग, वाघोदे. नंदुरबार
शहादा तालुका: 1) शहादा तालुका को-ऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी विकास मंदिर कनिष्ठ
महाविद्यालय, शहादा 2) पूज्य साने गुरुजी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोणखेडा.
अक्कलकुवा तालुका: 1) संत जगनाडे महाराज शिक्षण मंडळ संचलित श्री बापूसाहेब व्ही. सी.
चौधरी महाविद्यालय, खापर. 2) कालिकामाता मंदिर ट्रस्ट, अक्कलकुवा.
तळोदा तालुका: अध्यापक शिक्षक मंडळ सी. एस. चौधरी आर्ट्स, एस. जी. पटेल कॉमर्स ॲन्ड
बाबाजी बी. जे. पटेल सायन्स कॉलेज, तळोदा.
अक्राणी तालुका: आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महाराज ज. पो. वळवी
कला, वाणिज्य आणि वि.कृ. कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय. अक्राणी
नवापूर तालुका: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था , नवापूर.
या रोजगार मेळाव्यात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या उद्योजक, कंपन्या व आस्थापनांनी त्यांच्याकडील रिक्त
पदांची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार या कार्यालयास
संपर्क साधावा.
युवक-युवतींसाठी नोंदणी आवाहन: या 'रोजगार महाकुंभ' मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdZASbQHp5JUzwxCQvuFabl_Sal
KhfjHSINUc9TN6FVJpiLbw/viewform?pli=1 या लिंकवर आपली नोंदणी करणे अनिवार्य
आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे
आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर