अंडरपास पुलाच्या जागेची खासदार डॉ. कल्याण काळे, रेल्वे व मनपा अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी!
छत्रपती संभाजीनगर, 21 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील राजनगर आणि मुकुंद नगर परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन ये-जा करण्याच्या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वे विभाग आणि छत्
अ


छत्रपती संभाजीनगर, 21 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील राजनगर आणि मुकुंद नगर परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन ये-जा करण्याच्या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वे विभाग आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रस्तावित रेल्वे अंडरपास पुलाच्या जागेची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली.

नागरिकांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न: या परिसरातून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना, कामगारांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना रेल्वे रुळांमुळे मोठ्या वाहतूक कोंडीला आणि गैरसोयीला सामोरे जावे लागत होते.प्रस्तावित अंडरपास पूल: नागरिकांची ही अडचण दूर करण्यासाठी येथे अंडरपास पूल उभारण्याच्या दृष्टीने जागेची तांत्रिक पाहणी करण्यात आली.प्रशासकीय समन्वय: रेल्वे अधिकारी व मनपा अधिकाऱ्यांनी जागेचा नकाशा, रुंदी आणि तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा केली. काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक ते निर्देश खासदार डॉ. कल्याण काळे यांनी अधिकाऱ्यांना दिले. या पाहणी दौऱ्यादरम्यान परिसरातील ज्येष्ठ नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande