बीड : आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला खो-खो स्पर्धा २०२६ चे उद्घाटन
बीड, 21 सप्टेंबर (हिं.स.)। पाटोदा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व नवगण शिक्षण संस्था संचलित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला खो-खो स
बीड : आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला खो-खो स्पर्धा २०२६ चे उद्घाटन


बीड, 21 सप्टेंबर (हिं.स.)। पाटोदा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व नवगण शिक्षण संस्था संचलित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला खो-खो स्पर्धा २०२६ चे उद्घाटन भाजप नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी केले.

याप्रसंगी उपस्थित राहून स्पर्धेचे उद्घाटन करताना सर्व सहभागी खेळाडूंना उत्कृष्ट खेळासाठी शुभेच्छा दिल्या. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होतात. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची उत्तम संधी मिळत आहे.

यावेळी ह.भ.प. रामकृष्ण रंधवे बापू, युवा नेते सागर धस, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप, क्रीडा संचालक प्रा. डॉ. सचिन देशमुख, प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, नगराध्यक्ष राजू जाधव, प्रा. नाना गोडबोले यांच्यासह खेळाडू, विद्यार्थी व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande