मराठवाडयात मंगळवैरा हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
परभणी, 21 सप्टेंबर (हिं.स.)। प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात मंगळवारी 22 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्हयात 22 सप्टेंबर राजी तूरळक ठिकाणी वादळी व
मराठवाडयात मंगळवैरा हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता


परभणी, 21 सप्टेंबर (हिं.स.)। प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात मंगळवारी 22 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

नांदेड जिल्हयात 22 सप्टेंबर राजी तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 24 तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही तर त्यानंतर 48 तासात 1 ते 2 अं.से. ने वाढ होउन त्यानंतर 2 ते 4 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. किमान तापमानात पुढील दोन दिवसात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande