पेशवा व्हीट लिमिटेडचा 53.52 कोटी रुपयांचा IPO 24 सप्टेंबरपासून
* 95 ते 101 रुपये प्रति शेअर किंमतपट्टा; BSE SME वर होणार लिस्टिंग मुंबई, 21 सप्टेंबर (हिं.स.) - गहू आधारित उत्पादनांच्या प्रक्रियेत कार्यरत असलेल्या पेशवा व्हीट लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री प्रस्ताव (IPO) 24 सप्टेंबर 2026 रोजी खुला
Peshwa Wheat Ltd


* 95 ते 101 रुपये प्रति शेअर किंमतपट्टा; BSE SME वर होणार लिस्टिंग

मुंबई, 21 सप्टेंबर (हिं.स.) - गहू उत्पादनांचे प्रक्रिया आणि पुरवठा करणारी कंपनी 'पेशवा व्हीट लिमिटेड' (Peshwa Wheat Ltd) आपला 53.52 कोटींचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) घेऊन भांडवली बाजारात धडक देत आहे. येत्या 24 सप्टेंबर 2026 पासून हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार असून 28 सप्टेंबर 2026 रोजी बंद होईल. कंपनीचे शेअर्स 1 ऑक्टोबर 2026 रोजी बीएसई एसएमई (BSE SME) प्लॅटफॉर्मवर लिस्ट होतील.

आयपीओ आणि शेअर्सची रचना...
 
कंपनीने या आयपीओसाठी 95 ते 101 रुपये प्रति शेअर असा प्राईस बँड निश्चित केला आहे. या इश्यूअंतर्गत एकूण 52.99 लाख शेअर्स विक्रीसाठी आणले जात आहेत. यात 50.04 लाख शेअर्सचा फ्रेश इश्यू आहे, तर 2.95 लाख शेअर्स मार्केट मेकरसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत.
किरकोळ विश्वासासाठी 25.03 लाख शेअर्स (एकूण इश्यूच्या 50.02 टक्के) राखीव ठेवण्यात आले आहेत. जरी या आयपीओचा लॉट साईज 1200 शेअर्सचा असला, तरी किरकोळ गुंतवणूकदाराला किमान 2400 शेअर्ससाठी (2 लॉट) अर्ज करावा लागेल. यासाठी उच्च प्राईस बँडनुसार (101 रुपये) 2,42,400 ची गुंतवणूक आवश्यक असेल. तर एचएनआय (HNI) श्रेणीसाठी किमान 3,600 शेअर्ससाठी (3,63,600 रुपये) अर्ज करावा लागेल.
आयपीओची मुख्य वैशिष्ट्ये
 
* आयपीओ कालावधी: 24 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2026.
* प्राईस बँड: 95 ते 101 रुपये प्रति शेअर.
* इश्यू साईझ: 53.52 कोटी रुपये. (52.99 लाख शेअर्स)
* रिटेल गुंतवणूकदार (किमान अर्ज): 2400 शेअर्स (2,42,400 रुपये)
* एचएनआय गुंतवणूकदार (किमान अर्ज): 3600 शेअर्स (3,63,600 रुपये.)
* लिस्टिंग तारीख: 1 ऑक्टोबर 2026 (BSE SME)
* लीड मॅनेजर / रजिस्ट्रार: फिनॅक्स कॅपिटल ॲडव्हायझर्स / माशितला सिक्युरिटीज.
निधीचा वापर कुठे होणार?
 
* कंपनी आयपीओमधून उभारलेल्या 53.52 कोटी रुपये:
* प्लांट व मशिनरी खरेदी: 6.69 कोटी रुपये.
* सिव्हिल कन्स्ट्रक्शन (बांधकाम): 5.01 कोटी.
* वर्किंग कॅपिटल (कार्यकारी भांडवल): 26.50 कोटी.
* उर्वरित रक्कम: सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरली जाईल.
कंपनीची आर्थिक कामगिरी...
 
पेशवा व्हीट लिमिटेडची आर्थिक स्थिती मजबूत राहिली आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये कंपनीचा महसूल आणि नफा दोन्हीमध्ये मोठी वाढ झाली आहे. एकूण उत्पन्न 171.55 कोटी रुपयांवरून (FY 2025) 215.96 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. (FY 2026) तर एबिटा 18.05 कोटींवरून 22.73 कोटींवर पोहोचले आहे. तर करोत्तर नफ्यात देखील वाढ झाली आहे. ते 11.84 कोटींवरून 15.81 कोटींवर पोहोचले आहे.
मार्च 2026 पर्यंत कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी 44.96 टक्के आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड 33.44 टक्के नोंदवला गेला आहे. कंपनीचा डेट-टू-इक्विटी रेशिओ 0.55 आहे, तर एबिटा मार्जिन 10.53 टक्के आणि पीएटी मार्जिन 7.32 टक्के आहे. आयपीओनंतर प्रवर्तकांची भागभांडवलातील हिस्सेदारी 52.39 टक्क्यांवर येईल.
दरम्यान, अहमदाबाद, राजकोट आणि सुरत येथील अनधिकृत ग्रे मार्केटमध्ये या शेअरचा प्रीमियम 58 ते 60 रुपये प्रति शेअर चालत आहे. म्हणजेच उच्च प्राईस बँडनुसार (101 रुपये) हा शेअर 57 ते 59 टक्के लिस्टिंग गेनचे संकेत देत आहे. सन 2023 मध्ये स्थापन झालेली ही भारतीय कंपनी इंदूर येथील 56,10 cut क्षमता (MTPA) असलेल्या प्लांटमधून गव्हावर आधारित प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ तयार करते आणि 4 राज्यांमध्ये संस्थात्मक आणि घाऊक ग्राहकांना पुरवठा करते.

या संदर्भात बोलताना पेशवा व्हीट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राहत अली सय्यद म्हणाले, “हा IPO आमच्या विकासाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असून, विस्ताराच्या पुढील टप्प्यासाठी आमची आर्थिक क्षमता अधिक मजबूत करेल. IPO मधून मिळणारा निधी प्लांट आणि मशिनरी, नागरी पायाभूत सुविधा तसेच कार्यभांडवलासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे आमच्या कार्यक्षमतेत वाढ, क्षमतेचा अधिक प्रभावी वापर आणि महत्त्वाच्या बाजारपेठांमधील उपस्थिती मजबूत करण्यास मदत होईल.

वाढता B2B ग्राहकवर्ग आणि एकात्मिक प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून विस्तारक्षम आणि कार्यक्षम व्यवसाय उभारण्यावर आमचा भर आहे. कंपनीचे लिस्टिंग झाल्यानंतर तिची दृश्यमानता आणि विश्वासार्हता वाढण्यासोबतच दीर्घकालीन विकासाच्या संधींचा पाठपुरावा करण्याची क्षमता अधिक बळकट होईल, असा आम्हाला विश्वास आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande