बीडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 14 जणांवर गुन्हा दाखल
बीड, 21 सप्टेंबर (हिं.स.)। बीड शहरातील पांडे गल्ली, हिरालाल चौक परिसरात सुरू असलेल्या पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर डीवायएसपी वेंकटराम यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, रोख रक्कम, पत्ते व जुगाराचे साह
पोलीस कारवाई


बीड, 21 सप्टेंबर (हिं.स.)। बीड शहरातील पांडे गल्ली, हिरालाल चौक परिसरात सुरू असलेल्या पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर डीवायएसपी वेंकटराम यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, रोख रक्कम, पत्ते व जुगाराचे साहित्य असा 4 लाख 22 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 21 सप्टेंबर रोजी पहाटे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमातील कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande