
पुणे, 21 सप्टेंबर (हिं.स.)। शहरात गणेशोत्सवाच्या सहा दिवसांत तब्बल ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तसेच महापालिकेच्या वतीने ६८ हजार ६३३ किलो निर्माल्याचे संकलन करण्यात आले आहे. संकलित निर्माल्याचा वापर खतनिर्मितीसाठी करण्यात येणार आहे.
गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी पुणे महापालिकेने नदीघाटांसह शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवस्था केली आहे. सोसायट्या आणि सार्वजनिक ठिकाणी बांधलेले हौद, लोखंडी टाक्या तसेच पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवायमूर्तीसंकलनासाठी विविध ठिकाणी स्टॉल उभारण्यातआल्यानेनागरिकांकडून त्यालाही प्रतिसाद मिळत आहे.१४ ते १९ सप्टेंबर या कालावधीत बांधलेल्या हौदांमध्ये ८ हजार ४०२ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. तर लोखंडी टाक्यांमध्ये सर्वाधिक ३४ हजार ११९ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
याच काळात ११ हजार ३३१ गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले.विसर्जनासोबतच निर्माल्य संकलनावरही महापालिकेने भर दिला असून, सहा दिवसांत एकूण ६८ हजार ६३३ किलो निर्माल्य जमा झाले आहे. या निर्माल्यापासून खत तयार केले जाणार आहे.गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर विसर्जन झाले. या दिवशी २० हजार २८९ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर सहाव्या दिवशी, गौरी विसर्जनासह गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत १२ हजार ५१५ मूर्तींचे विसर्जन झाल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु