शिक्षकांना धमकी देणे हा लोकशाही मार्ग नव्हे- सतीश चव्हाण
- आ. प्रशांत बंब यांना सुनावले खडे बोल छत्रपती संभाजीनगर, २१ सप्टेंबर (हिं.स.) : गंगापूर तालुक्यातील एका कार्यक्रमात आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांना निलंबित करण्याची भाषा केल्याचा तसेच शिक्षक आणि पदवीधर आमदारांची गरज नसल्याचे वक्तव्य केल्याचा द
Q


- आ. प्रशांत बंब यांना सुनावले खडे बोल

छत्रपती संभाजीनगर, २१ सप्टेंबर (हिं.स.) : गंगापूर तालुक्यातील एका कार्यक्रमात आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांना निलंबित करण्याची भाषा केल्याचा तसेच शिक्षक आणि पदवीधर आमदारांची गरज नसल्याचे वक्तव्य केल्याचा दावा करत माजी आमदार सतीश चव्हाण यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

शिक्षकांना धमकी देणे हा लोकशाही मार्ग नाही, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. शिक्षकांवर मुख्यालयी वास्तव्याची सक्ती करण्यापूर्वी मतदारसंघातील शाळांना आवश्यक मूलभूत सुविधा तसेच चांगले रस्ते उपलब्ध करून देण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

विधान परिषद आणि शिक्षक-पदवीधर मतदारसंघाची घटनात्मक रचना असल्याचे नमूद करत चव्हाण यांनी, “आज शिक्षक आणि पदवीधर आमदार नको म्हणत असाल, तर उद्या विधान परिषदच नको असेही म्हणाल का?” असा सवाल उपस्थित केला.सत्ताधारी पक्षाचे आमदार असलेल्या प्रशांत बंब यांच्या शिक्षकांबाबतच्या कथित वक्तव्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नावरून राजकीय वादाला पुन्हा तोंड फुटले आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande