नाशकात दुकान फोडून पावणे तीन लाखांच्या विदेशी दारूच्या बाटल्यांची चोरी
नाशिक, 21 सप्टेंबर (हिं.स.)। : मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दारूच्या दुकानात प्रवेश करून विदेशी कंपन्यांच्या सुमारे पावणेतीन लाख रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्याची घटना गंगापूर रोड येथे घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहित
नाशकात दुकान फोडून पावणे तीन लाखांच्या विदेशी दारूच्या बाटल्यांची चोरी


नाशिक, 21 सप्टेंबर (हिं.स.)।

: मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दारूच्या दुकानात प्रवेश करून विदेशी कंपन्यांच्या सुमारे पावणेतीन लाख रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्याची घटना गंगापूर रोड येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी संतोष पंढरी खातळे (रा. नंदनवन सोसायटी, म्हसरूळ) हे गंगापूर रोडवरील सिरीन मेडोज्जवळ असलेल्या ग्रेनॉच कंपनीच्या लिकर पॅव्हेलियनचे काम पाहतात. दि. १९ व २० सप्टेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दारूच्या दुकानात प्रवेश केला व त्या ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या सुमारे २ लाख ७६ हजार १५० रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार अहिरे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande