उदगीरमध्ये 90 दिव्यांगांचे जयपूर फूटसाठी मोजमाप
लवकरच होणार कृत्रिम हात-पायांचे वाटप लातूर, 21 सप्टेंबर (हिं.स.) : उदगीर येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या पुढाकारातून दिव्यांग बांधवांसाठी जयपूर फूट, कृत्रिम हात-पाय तसेच अन्य सहाय्यक साधनांसाठी मोजमाप शिबिर शनिवारी उपजिल्हा रुग्णालयात पार प
शिबिर


लवकरच होणार कृत्रिम हात-पायांचे वाटप

लातूर, 21 सप्टेंबर (हिं.स.) : उदगीर येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या पुढाकारातून दिव्यांग बांधवांसाठी जयपूर फूट, कृत्रिम हात-पाय तसेच अन्य सहाय्यक साधनांसाठी मोजमाप शिबिर शनिवारी उपजिल्हा रुग्णालयात पार पडले. या शिबिरात एकूण 90 दिव्यांग बांधवांच्या हात-पायांचे मोजमाप घेण्यात आले. लवकरच आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात संबंधितांना जयपूर फूट व कृत्रिम हात-पायांचे वाटप करण्यात येणार आहे.

रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या पुढाकारातून रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर, श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळ, उदगीर, सक्षम दिव्यांग सेवा केंद्र, उदगीर तसेच रोटरॅक्ट क्लब ऑफ स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ नर्सिंग, उदगीर यांच्या सहयोगाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरात गुडघ्याखालील कृत्रिम पायासाठी 35 दिव्यांगांचे, गुडघ्यावरील कृत्रिम पायासाठी 17 दिव्यांगांचे, कृत्रिम हातासाठी 5 दिव्यांगांचे आणि कॅलिपरसाठी एका दिव्यांगाचे मोजमाप घेण्यात आले. याशिवाय 30 दिव्यांग बांधवांना कुबड्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भारत कांबळे, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष अॅड. विक्रम संकाये, उपाध्यक्ष विजयकुमार पारसेवार, सचिव डॉ. सुधीर जाधव, प्रोजेक्ट चेअरमन विशाल जैन, सक्षम संस्था उदगीरचे रविकिरण बेळकुंदे, प्रशांत मांगुळकर, संतोष फुलारी, प्रमोद शेटकार, मोतीलाल डोईजोडे, डॉ. दत्तात्रय पाटील, महानंदा सोनटक्के, प्रा. मंगला विश्वनाथे, सरस्वती चौधरी, विशाल तोंडचिरकर, निशांत धवलशंख, रामभाऊ सोनटक्के, रामदास जळकोटे, नारायण वाकुडे, तानाजी वाकुडे, व्यंकट कणसे, विद्या पांढरे, उदय धुर्वे, अजय अंबेसंगे, कमलेश पेठे तसेच रत्ननिधी फाउंडेशनचे राजेश माने उपस्थित होते.

यावेळी रोटरॅक्ट क्लब ऑफ स्वामी विवेकानंद नर्सिंग आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ स्वामी विवेकानंद फार्मसीचे पदाधिकारी तसेच रोटरी क्लबचे सदस्यही उपस्थित होते.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande