छ.संभाजीनगर : सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 21 सप्टेंबर (हिं.स.)।श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, खामसवाडी कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्याच्या दृष्टीने बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा विधिवत धार्मिक वातावरणात संपन्न झाला. श्री सिध्दीविना
छ.संभाजीनगर : सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न


छत्रपती संभाजीनगर, 21 सप्टेंबर (हिं.स.)।श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, खामसवाडी कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्याच्या दृष्टीने बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा विधिवत धार्मिक वातावरणात संपन्न झाला. श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मातोश्री मिनाताई कुलकर्णी यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले.

यावेळी आगामी गळीत हंगामासाठी कारखान्याची तयारी, यंत्रसामग्रीची सज्जता, तांत्रिक व्यवस्था आणि विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. हंगाम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली असून, नियोजनबद्ध पद्धतीने गळीत हंगाम राबविण्यासाठी कारखाना प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले.ऊस उत्पादक शेतकरी हा कारखान्याच्या वाटचालीतील केंद्रबिंदू असून, शेतकऱ्यांचा विश्वास, कामगारांचे परिश्रम आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचे योगदान यांच्या बळावर आगामी हंगाम यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

सन २०२६-२७ च्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगली सेवा देतानाच कारखान्याचे कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.यावेळी बालाजी कोरे, दिनेश कुलकर्णी, गणेश कामटे, प्रतिक देवळे, मंगेश कुलकर्णी, प्रथमेश आवटे तसेच कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande