
छत्रपती संभाजीनगर, 21 सप्टेंबर (हिं.स.)।
त्र्यंब्यकगड, भालगाव, ता. छत्रपती संभाजीनगर येथे आमदार विलास भुमरे यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी गडावरील विविध अडीअडचणी जाणून घेत नागरिकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
तसेच नवीन सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यासोबतच मारुती मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार असून, या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांसह भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
गडाचा विकास, भाविकांच्या सुविधा आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत आवश्यक विकासकामे सातत्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, स्थानिक शिवसेना पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis