संतपीठ पैठण संदर्भातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर बैठक
छत्रपती संभाजीनगर, 21 सप्टेंबर (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे आज संतपीठ पैठण संदर्भातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर शिवसेना आमदार विलास भुमरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी संतपीठाच्या पुढील क
Q


छत्रपती संभाजीनगर, 21 सप्टेंबर (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे आज संतपीठ पैठण संदर्भातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर शिवसेना आमदार विलास भुमरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

यावेळी संतपीठाच्या पुढील कार्यवाही, विकास, शैक्षणिक तसेच प्रशासकीय बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संतपरंपरा, अध्यात्म आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा जपत संतपीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तसेच समाजाला अधिकाधिक ज्ञान आणि संस्कार मिळावेत, यासाठी विविध विषयांवर विचारविनिमय करण्यात आला.संतपीठाच्या विकासाला गती देऊन त्याचे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यावर यावेळी भर देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande