अधिकाऱ्यांकडून कन्नड सोयगाव तालुक्यातील शेतावर जाऊन पीक पाहणी
छत्रपती संभाजीनगर, 21 सप्टेंबर (हिं.स.)।पावसाच्या अनियमिततेमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा परिणाम शेतातील पिकांवर होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विनयी गौडा, उपविभागीय अधिकारी (SDM) गोरड आणि तहसीलदार सारिका भगत यांच्य
अ


छत्रपती संभाजीनगर, 21 सप्टेंबर (हिं.स.)।पावसाच्या अनियमिततेमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा परिणाम शेतातील पिकांवर होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विनयी गौडा, उपविभागीय अधिकारी (SDM) गोरड आणि तहसीलदार सारिका भगत यांच्यासह आमदार संजना जाधव यांनी कन्नड सोयगाव तालुक्यातील शेतावर जाऊन पीक पाहणी केली.

यावेळी पिकांची सद्यस्थिती, पावसाचे प्रमाण, पाण्याची उपलब्धता आणि पिकांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शासनाच्या नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.शेतकऱ्यांना या संकटातून दिलासा मिळावा, त्यांच्या नुकसानीची योग्य नोंद व्हावी आणि पात्रतेनुसार शासनाच्या मदतीचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, नागरिक, शेतकरी बांधव उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande