पाकिस्तानात इंधन टंचाई झाल्यास पेट्रोल १,००० रुपये लिटरपर्यंत जाण्याचा इशारा
इस्लामाबाद, 21 सप्टेंबर (हिं.स.)। पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेज मलिक यांनी कडक इशारा दिला की, देशात इंधनाची टंचाई निर्माण झाल्यास पेट्रोलच्या किमती १,००० रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचू शकतात. मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढल्यामुळे जगभरा
पाकिस्तानात इंधनटंचाई झाल्यास पेट्रोल १,००० रुपये लिटरपर्यंत जाण्याचा इशारा


इस्लामाबाद, 21 सप्टेंबर (हिं.स.)। पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेज मलिक यांनी कडक इशारा दिला की, देशात इंधनाची टंचाई निर्माण झाल्यास पेट्रोलच्या किमती १,००० रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचू शकतात. मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढल्यामुळे जगभरातील तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत.

पाकिस्तानी वृत्तसंकेतस्थळनुसार, लाहोरमध्ये पत्रकारांशी बोलताना मलिक यांनी सांगितले की, पाकिस्तानमध्ये पेट्रोलियम पदार्थांच्या किमती आधीच ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. तसेच युरोप आणि अमेरिकेतही किमती वेगाने वाढत आहेत. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानला हुती बंडखोरांचे हल्ले मान्य नाहीत. इंधनाच्या वाढत्या किमतींचा परिणाम कमी करण्यासाठी सरकार समाजातील दुर्बल घटकांना दिलासा देत आहे.

ऊर्जेच्या संदर्भात बोलताना मंत्र्यांनी सांगितले की, तेलाच्या विहिरींवरील काम सुरू झाले असून, ऑक्टोबरपर्यंत देशातच कच्चे तेल उपलब्ध होईल, अशी सरकारला अपेक्षा आहे. त्यामुळे महागड्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होऊ शकते.

मध्य पूर्वेत पुन्हा तणाव वाढणे आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद होण्याच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जागतिक तेल बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असून, इंधनाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. किमतींमध्ये नुकत्याच झालेल्या बदलानंतर पाकिस्तानमध्ये पेट्रोल ३८९.१४ रुपये प्रति लिटर, तर हाय-स्पीड डिझेल ४२४.०४ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी गेल्या रविवारी विशेष मदत योजना सुरू केली. या योजनेंतर्गत मोटारसायकल, रिक्षा आणि चिंगची मालक तसेच ८०० सीसीपर्यंतच्या वाहनांच्या चालकांना पेट्रोलवर प्रति लिटर १०० रुपयांची सवलत दिली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande