
परभणी, 21 सप्टेंबर (हिं.स.)।
पूर्णा तालुक्यात सोमवारी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी नुकसान झाले. महागाव येथे शेतात काम करीत असताना सुमित्राबाई मधुकर भालेराव यांच्यावर वीज कोसळल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आडगाव येथे गोविंद साहेबराव यांच्या बैलावर वीज पडल्याने तो दगावल्याची माहिती तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी दिली. या घटनांमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. महागाव व आडगाव परिसरातील नुकसानीची संबंधित यंत्रणेकडून पाहणी करून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis