
नंदुरबार, 21 सप्टेंबर (हिं.स.) एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आणि राष्ट्रीय कृषि विकास योजना सन 2026-27 अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण कृषी घटकांसाठी महाडिबीटी https://mahadbt2.maharashtra.gov.in/farmer संकेतस्थळावर अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत क्षेत्रविस्तार ड्रॅगन फ्रुट
लागवड, स्ट्रॉबेरी लागवड, मधुक्षिका पालन, मशरुम उत्पादन प्रकलप, जुन्या फळबागांचे पुर्न्नजीवन,
मसाला पिके, सामुहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, संरक्षित शेती घटकांपर्यंत हरितगृह
उभारणी, शेडनेट हाऊस उभारणी. तसेच प्लॉस्टिक मल्चींग, वीड मॅट, फलोत्पादन यांत्रिकीकरण, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, जमिन सुधारणा,
मशागत उपकरणे, पॉवर नॅपसॅक पंप, काढणीत्तोर व्यवस्थापन अंतर्गत पॅक हाऊस उभारणी.
पुर्वशीतकरणगृह उभारणी, शीतखोली, रेफर वॅन, रायपनिंग चेबर, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, कांदा चाळ
उभारणी व फिरते विक्री केंद्र, इत्यादी घटकांच तसेच औषधी वनस्पती इत्यादी घटकांसाठी महाडिबीटी
पोर्टलवर अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर