दूरवरून आलेल्या प्रवाशाला दोन क्षण निवांत बसता यावं, एवढीच साधी अपेक्षा - जगजीत सिंह राणा
छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। दूरवरून आलेल्या प्रवाशाला दोन क्षण निवांत बसता यावं, एवढीच साधी अपेक्षा असते असे आमदार जगजीत सिंह राणा यांनी सांगितले. तुळजापूरला आई भवानीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. कुणी लांबचा प्रवास करून आले
अ


छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। दूरवरून आलेल्या प्रवाशाला दोन क्षण निवांत बसता यावं, एवढीच साधी अपेक्षा असते असे आमदार जगजीत सिंह राणा यांनी सांगितले.

तुळजापूरला आई भवानीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. कुणी लांबचा प्रवास करून आलेलं असतं, कुणासोबत लहान मुलं असतात, तर कुणी वयस्कर असतं. प्रवासाचा थकवा घेऊन बसची वाट पाहताना काही क्षण निवांत बसण्याची जागा मिळाली, तरी मनाला मोठा आधार मिळतो.

हीच गरज लक्षात घेऊन आमदार विकासनिधीतून तुळजापूर एस.टी. बसस्थानक परिसरात प्रवासी विश्रामगृहाची सुविधा सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे, या सुविधेची सुरुवात उपस्थित असलेल्या ज्येष्ठ महिला प्रवाशांच्या हस्ते करण्यात आली. रोजच्या प्रवासात अशा छोट्या-छोट्या अडचणींना सामोरं जाणाऱ्या माणसाच्या हातूनच या सुविधेची सुरुवात व्हावी, यापेक्षा आपुलकीची गोष्ट दुसरी काय असू शकते?

मोठ्या विकासकामांसोबतच सामान्य माणसाला रोजच्या आयुष्यात थोडा दिलासा देणाऱ्या सुविधा उभ्या राहणं, हाच विकासाचा खरा अर्थ आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande