
छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। जालना जिल्ह्यातील सर्व जलस्रोतांचे लेखापरीक्षण करून संभाव्य पाणीटंचाईची ठिकाणे निश्चित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात येईल.
असे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या.
तसेच पिण्याचे पाणी व चारा उपलब्धतेवर विशेष लक्ष केंद्रित करून शेजारील जिल्ह्यांशी समन्वय साधण्यात येईल. जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक पूर्वनियोजन करून उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यातील सर्व पाण्याचे स्त्रोत शोधून त्यांची उपलब्धता व सद्यःस्थितीची माहिती संकलित करून ठेवावी. तसेच, पिक कापणी प्रयोगाच्या आधारेच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी पिक कापणी प्रयोग गांभीर्याने व अचूकपणे पूर्ण करावेत. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी टंचाईसंदर्भात बैठक घेऊन आवश्यक त्या उपाययोजनांचे पूर्वनियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis