वर्ध्यात १९ ऑक्टोबरपर्यंत ध्वनिप्रदूषणावर निर्बंध
वर्धा, 22 सप्टेंबर (हिं.स.) | आगामी गणेशोत्सव, हाडपक्या (मस्कऱ्या) गणपती, घटस्थापना, नवरात्रोत्सव, गरबा-डांडिया, संदल तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा पोलिसांनी ध्वनिप्रदूषणास प्रतिबंध करण्यासाठी कडक आदेश जारी
वर्ध्यात १९ ऑक्टोबरपर्यंत ध्वनिप्रदूषणावर निर्बंध


वर्धा, 22 सप्टेंबर (हिं.स.) | आगामी गणेशोत्सव, हाडपक्या (मस्कऱ्या) गणपती, घटस्थापना, नवरात्रोत्सव, गरबा-डांडिया, संदल तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा पोलिसांनी ध्वनिप्रदूषणास प्रतिबंध करण्यासाठी कडक आदेश जारी केला आहे. सार्वजनिक शांतता, नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी हा आदेश २१ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजेपासून १९ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या परिसरात ध्वनीक्षेपक, लाऊडस्पीकर, अँम्प्लीफायर अथवा ध्वनी निर्माण करणाऱ्या अन्य उपकरणांचा वापर करण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्याची लेखी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवानगी मिळाल्यानंतरही आयोजकांना शासनाने निर्धारित केलेल्या ध्वनीमर्यादांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. रात्री १० ते सकाळी सहा या वेळेत ध्वनीक्षेपक, लाऊडस्पीकर, अँम्प्लीफायर किंवा अन्य ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरास सक्त मनाई राहणार आहे. जिल्हादंडाधिकाऱ्यांनी विशेष परवानगी दिलेल्या दिवस व वेळेतही संबंधित शासकीय नियमांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे.रुग्णालये, शाळा, न्यायालयांजवळ विशेष दक्षता रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये तसेच शासनाने अधिसूचित केलेल्या शांतता क्षेत्रात ध्वनीमर्यादा व इतर निर्बंधांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. उत्सवाच्या काळात ध्वनिक्षेपकामुळे सार्वजनिक शांतता, नागरिकांचे आरोग्य किंवा सुरक्षिततेला बाधा निर्माण होणार नाही, याची जबाबदारी आयोजकांवर राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande