कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी अधिकृत संपर्क व्यवस्था सुरू
डोंबिवली, २२ सप्टेंबर (हिं.स.) : कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना आपल्या समस्या, सूचना, तक्रारी तसेच प्रलंबित प्रश्न थेट मांडता यावेत, यासाठी ऑफिस ऑफ डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अधिकृत संपर्क व्यवस्था आणि संकेतस्थळ सुरू करण्यात आले आ
Ph01


डोंबिवली, २२ सप्टेंबर (हिं.स.) : कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना आपल्या समस्या, सूचना, तक्रारी तसेच प्रलंबित प्रश्न थेट मांडता यावेत, यासाठी ऑफिस ऑफ डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अधिकृत संपर्क व्यवस्था आणि संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना ९३७६५ ६७५६७ या संपर्क क्रमांकावर तसेच officedrshrikantshinde.com या संकेतस्थळाद्वारे आपल्या समस्या आणि सूचना कार्यालयापर्यंत पोहोचवता येणार आहेत.

खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे हे मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विविध माध्यमांतून संवाद साधत आहेत. ‘खासदार आपल्या भेटीला’, ‘जनता दरबार’ यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रश्नांवर संबंधित शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासकीय यंत्रणांशी समन्वय साधला जातो.

नागरिकांच्या अनेक समस्या महापालिका, शासकीय विभाग, स्थानिक प्रशासन तसेच अन्य सार्वजनिक यंत्रणांशी संबंधित असतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरबसल्या किंवा आपल्या सोयीच्या वेळेनुसार समस्या मांडता याव्यात, या उद्देशाने ही अधिकृत संपर्क व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक, आरोग्य, सार्वजनिक सुविधा, शासकीय कार्यालयांशी संबंधित प्रलंबित कामे तसेच अन्य नागरी प्रश्न नागरिकांना या माध्यमातून मांडता येणार आहेत. समस्या नोंदविताना आवश्यक माहिती, संबंधित कागदपत्रे, छायाचित्रे किंवा अन्य तपशील दिल्यास त्यावर पाठपुरावा करणे अधिक सुलभ होणार आहे.

प्राप्त तक्रारी आणि निवेदनांची माहिती घेऊन संबंधित विभागांशी संपर्क साधत आवश्यक कार्यवाहीसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावाही घेण्यात येणार असल्याचे कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.

नागरिकांसाठी अधिकृत संपर्क

संपर्क क्रमांक : +91 93765 67567

संपर्काची वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६

संकेतस्थळ : officedrshrikantshinde.com

नागरिकांनी आपल्या समस्या, सूचना आणि तक्रारी अधिकृत माध्यमातून कार्यालयापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन ऑफिस ऑफ डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande