अमरावती जिल्हा बँकेच्या मतदारयादीवरून वादाची ठिणगी
अमरावती, 22 सप्टेंबर (हिं.स.)अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरवात झाली आहे. विभागीय सहनिबंधकांकडून अस्थायी मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, या प्रारूप यादीमध्ये समाविष्ट ११०५ सदस्यांच्या संदर्भात विरोधी स
जिल्हा बँकेच्या मतदार यादीत 2825 मतदार ३० सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचनाची मुदत


अमरावती, 22 सप्टेंबर (हिं.स.)अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरवात झाली आहे. विभागीय सहनिबंधकांकडून अस्थायी मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, या प्रारूप यादीमध्ये समाविष्ट ११०५ सदस्यांच्या संदर्भात विरोधी संचालकांनी विरोध दर्शविला असून येत्या दोन दिवसांत याविरोधात हरकत नोंदविण्यात येणार आहे. त्यामुळे अगदी सुरवातीपासनूच ही प्रक्रिया वादात अडकली आहे. या यादीमध्ये १४ तालुक्यांतील २८२५ सभासदांचा समावेश आहे.

प्रारूप मतदारयादी जाहीर झाली असून त्यावर ३० सप्टेंबरपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. यादीत समाविष्ट ११०५ सभासदांविरोधात आम्ही हरकती घेणार असल्याचे विरोधी संचालक रवींद्र गायगोले यांनी स्पष्ट केले आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील संचालक मंडळाचा कार्यकाळ चार ऑक्टोबरला संपुष्टात येत आहे.

मात्र विद्यमान पदाधिकाऱ्यांनी निवडणूक जाहीर होईपर्यंत आम्हालाच कार्यवाहक म्हणून कायम ठेवण्याची मागणी केली असून त्यावर मंगळवारी (ता. २१) उच्च न्यायालयाच्या मंबई खंडपीठात निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. मंगळवारी होणाऱ्या सुनावणीनंतर जिल्हा बॅंकेवर विद्यमान संचालक मंडळच प्रभारी म्हणून कार्यरत राहणार की प्रशासकांची नियुक्ती होणार, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा न्यायालयीन निर्णयाकडे लागल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande