जिंतूरच्या रास्तारोको प्रकरणी गुन्हा दाखल, हजारो आंदोलकांना केले आरोपी
परभणी, 22 सप्टेंबर (हिं.स.)। जिंतूर-जालना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ वर वसंतराव नाईक पुतळ्यासमोर रास्तारोको आंदोलन केल्याप्रकरणी जिंतूर पोलिसांनी विनोद विश्वनाथ आडे यांच्यासह १६ जणांची नावे नमूद करून अंदाजे २००० ते २५०० इतर आंदोलनकर्त्यांविरुद्
अ


परभणी, 22 सप्टेंबर (हिं.स.)। जिंतूर-जालना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ वर वसंतराव नाईक पुतळ्यासमोर रास्तारोको आंदोलन केल्याप्रकरणी जिंतूर पोलिसांनी विनोद विश्वनाथ आडे यांच्यासह १६ जणांची नावे नमूद करून अंदाजे २००० ते २५०० इतर आंदोलनकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या फिर्यादीनुसार, आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात उपोषणकर्ते नावे आरोपी म्हणून नमूद करण्यात आली आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनादरम्यान लाठ्या-काठ्या घेऊन ट्रकची तोडफोड करण्यात आली असून, त्याच्या काचा फुटल्याने अंदाजे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच सार्वजनिक शांततेचा भंग आणि दंगलीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचेही म्हटले आहे. आंदोलनकर्त्यांपैकी विनोद विश्वनाथ आडे यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच पोलिसांनी दिलेल्या कायदेशीर आदेशाचे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचेही गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे.

परभणी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) अन्वये १६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत निर्बंध लागू असताना हे आंदोलन झाल्याचे पोलिसांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी जिंतूर पोलीसांत गुन्हा क्रमांक ५५३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर नारायणराव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक नामदेव रेड्डी करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande