मुख्यमंत्री फडणवीस लातूर दुष्काळ पाहणी दौऱ्यावर
लातूर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.४५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन. त्यानंतर सकाळी १० वाजता लातूर विमानतळावरून निलंग्याकडे प्रयाण करतील. सकाळी १०.३० वाजता निलंगा तालुक्यातील जाऊ येथे आगम
देवेंद्र फडणवीस


लातूर, 22 सप्टेंबर (हिं.स.)।

दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.४५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन. त्यानंतर सकाळी १० वाजता लातूर विमानतळावरून निलंग्याकडे प्रयाण करतील. सकाळी १०.३० वाजता निलंगा तालुक्यातील जाऊ येथे आगमन होऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर निलंग्याहून खरोसा-लामजना परिसराकडे रवाना होतील. सकाळी ११ वाजता खरोसा-लामजना परिसरात नुकसानग्रस्त शेती आणि पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर खरोसा-लामजना येथून मुख्यमंत्री थेट सोलापूर जिल्ह्यातील येरमाळ्याकडे रवाना होणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande