अमरावतीत नागरी समस्यांचा बोजवारा; नगरसेवक चंद्रू खेडकर आक्रमक
अमरावती, 22 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील कचऱ्याचे साम्राज्य, तुंबलेल्या नाल्या आणि कोलमडलेली स्वच्छता व्यवस्था यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या आक्रोशाला अखेर नगरसेवक चंद्रू खेडकर यांनी वाचा फोडली. वारंवार तक्रारी करूनही ढिम्म बसलेले महापालिका प्
नागरी समस्यांचा बोजवारा; नगरसेवक चंद्रू खेडकर आक्रमक,


अमरावती, 22 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील कचऱ्याचे साम्राज्य, तुंबलेल्या नाल्या आणि कोलमडलेली स्वच्छता व्यवस्था यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या आक्रोशाला अखेर नगरसेवक चंद्रू खेडकर यांनी वाचा फोडली. वारंवार तक्रारी करूनही ढिम्म बसलेले महापालिका प्रशासन आणि गेंड्याची कातडी पांघरून बसलेले कंत्राटदार यांच्या मनमानी कारभाराचा निषेध करत नगरसेवक खेडकर यांनी झोन कार्यालयात थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर कचऱ्याची टोपली रिकामी केली. या खळबळजनक प्रकारामुळे महापालिकेचे भ्रष्ट आणि बेजबाबदार अधिकारी तसेच कामचोर कंत्राटदार चांगलेच हादरले आहेत.

शहराच्या सर्वच भागात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा उचलणारे कंत्राटदार केवळ बिले उकळण्यात मग्न आहेत, तर महापालिकेचे जबाबदार अधिकारी या कंत्राटदारांच्या दावणीला बांधले गेल्याचा घणाघाती आरोप नगरसेवक खेडकर यांनी केला. रस्त्यांवर कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असताना आणि साथीचे आजार पसरत असतानाही प्रशासन डोळ्यांवर ढोंग पांघरून बसले असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.

बैठकीतच उतरवला अधिकाऱ्यांचा माजझोन कार्यालयात आयोजित बैठकीत विकासकामे आणि स्वच्छतेच्या नावाने पुन्हा एकदा अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. प्रशासनाचा हा नाकर्तेपणा पाहून नगरसेवक खेडकर यांचा संयम सुटला. त्यांनी प्रभागातील कचरा थेट अधिकाऱ्यांच्या तोंडावर आणि बैठकीच्या टेबलवर फेकून कंत्राटदार-प्रशासन युतीचा तीव्र शब्दांत धिक्कार केला.

कामचोर कंत्राटदारांवर कारवाई करा, अन्यथा महापालिका पेटवून देऊ!या अनपेक्षित आणि प्रखर आंदोलनामुळे महापालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. एकीकडे भ्रष्ट अधिकारी या घटनेचा निषेध करत असले, तर दुसरीकडे नरकयातना भोगणाऱ्या सामान्य नागरिकांनी मात्र नगरसेवक खेडकर यांच्या या आक्रमक भूमिकेचे जोरदार समर्थन केले आहे. केवळ कागदी घोडे नाचवणाऱ्या आणि कंत्राटदारांची दलाली करणाऱ्या प्रशासनाला आता तरी जाग येणार की शहराला कचऱ्याच्या खाईत लोटणाऱ्या कंत्राटदारांना पाठीशी घातले जाणार? संबंधित निष्काळजी अधिकारी आणि कंत्राटदारावर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नगरसेवक चंद्रू खेडकर म्हणाले की, कंत्राटदारांना पोसणारे आणि वातानुकूलित केबिनमध्ये बसून माल मरणारे अधिकारी नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत! प्रभागात घाणीमुळे आजारपण पसरत असताना अधिकारी आणि कंत्राटदार मात्र लाचखोरीत मग्न आहेत. प्रशासनाचा आणि या कामचोर कंत्राटदारांचा माज उतरवण्यासाठीच हे पाऊल उचलावे लागले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande