
बीड, 22 सप्टेंबर (हिं.स.)। दुष्काळ जाहीर करून शेतकरी-पशुपालकांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची मंत्रायल, मुंबई येथे भेट घेऊन बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात व आष्टी मतदारसंघात तातडीने दुष्काळ जाहीर करावा मागणीचे निवेदन दिले.
पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान होत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याचबरोबर पशुपालकांसमोर चारा व पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया तातडीने करावी आणि दुष्काळग्रस्त शेतकरी व पशुपालकांना पीक नुकसानभरपाई, चारा, पाणी तसेच आवश्यक शासकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात मागणी यावेळी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis