अन्नातील भेसळ ओळखा, घरचे ताजे अन्न खा - दयानंद पाटील
छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजीत लोकसंवाद २०२६ या कार्यक्रमात आज गुलमोहर गणपती मंडळ, एन ५, सिडको जिजामाता स्कूलच्या समोर, गुलमोहर कॉलनी, येथे संपन्न झाला. आज या कार्यक्रमात अन्न औषध प्रशासन विभागाचे
अ


छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजीत लोकसंवाद २०२६ या कार्यक्रमात आज गुलमोहर गणपती मंडळ, एन ५, सिडको जिजामाता स्कूलच्या समोर, गुलमोहर कॉलनी, येथे संपन्न झाला. आज या कार्यक्रमात अन्न औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त दयानंद पाटील यांनी उपस्थित गणेश भक्तांना मार्गदर्शन केले. जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने तसेच मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, बाहेर मिळणारे खाद्य पदार्थ भेसळ युक्त असू शकतात. त्याबद्दल आपण सजग असायला हवे. घरचे आई नं बनवलेले पौष्टिक, स्वच्छ आणि सकस अन्न आपण सेवन केले पाहिजे. चवी च्या नादी वा फॅशन मुळे आपण न कळत प्रकृतीला हानिकारक पदार्थ सेवन करतो आणि आरोग्याची हानी करून घेतो. अन्न पदार्थातील भेसळ कशी ओळखावी यासाठी eat right या पोर्टल वर जाऊन माहिती करून घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हा माहिती कार्यालयाचे अनिल परदेशी, भगवान ढाकरे, तसेच मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष : तेजस व्यवहारे

उपाध्यक्ष : अनिकेत कदम

सरचिटणीस : दीपक अरोरा

सचिव :तेजस कोलते

कोषाध्यक्ष :पार्थ पाटील

सदस्य सौ. नलिनी कुलकर्णी, सौ. श्वेता कदम, सौ. प्रभावती कदम, सौ. प्रतिमा शेळके आदींनी परिश्रम घेऊन उपक्रम यशस्वी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande